ऋषी सहारे
संपादक
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुक मतदानाच्या दिवशी नजीर शहा पिरू शहा यांच्यासोबत दूर व्यवहार करण्याचा आरोप मोर्शी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्यावर करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.
काल दुपारी प्रदेशाध्यक्ष मनीष साठे एका पत्रकार परिषदेत घटनाक्रम सांगताना म्हणाले की मोर्शीचे ठाणेदार देशमुख यांच्या मुळे मोर्शीतील जनता त्रस्त्त झाली असून नाराज आहे.
मोर्शी मध्ये ठाणेदारांच्या कृपेमुळे वरली मटका आणि अवैध धंदे चालत आहे.अशी तक्रार त्यांनी 5 डिसेंबरला पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना दिली आहे.
परंतु आता पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीच ऍक्शन घेतली नाही.अशाने परिस्थिती बिघडून जनआंदोलन करण्याची वेळ येऊ शकते.
तसेच पाळा गावातील रहिवासी नजीर शहा पिरू शहा जे ड्रायव्हरचे काम करतात यांच्यावर कारण नसताना मारपीट करणे व जातीगत दूरव्यवहार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.
नझीर शहा यांचे घर पाळा येथील एका शाळेजवळ आहे.ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी घराच्या बाहेर नाझिर शाह उभे असताना ठाणेदार नितीन देशमुख यांनी त्यांना शिव्या देत म्हटले,तुम्ही येथे काय करत आहे? म्हणून नजीर शहा ने लिखित तक्रार दाखल करण्याची कोशिश केली,परंतु ड्युटीवर तैनात अधिकाऱ्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला.
नंतर अमरावती एसपी कार्यालय मध्ये तक्रार दाखल करण्याची कोशिश केली.परंतु तिथेही त्यांना उचित प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे ह्या घटनेवर आझाद समाज पार्टीने नाराजगी दाखविली आणि ठाणेदार नितीन देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तालुका अध्यक्ष अक्षय दी.पांडे यांनी पत्रकार परिषद द्वारे केली.