आज 2024 मध्ये आम्हाला अर्थ कळतो आहे,आमच्या बापाच्या ” त्या” हट्टाचा…
“मी ‘ संघम शरणं गच्छामी ‘म्हणणार नाही.”
—- डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( 14 आक्टोबर 1956 )
आमचा बाप हजारो वर्षांच्या दूरदृष्टीचा होता……
कारण……
तथागत भगवान बुद्धानी भिखू संघांसाठी कांही कठोर नियम केलेले होते….
1) कोणत्याही भिखूने एकाच घरी चारिकेसाठी दुसऱ्यांदा जाऊ नये.
2) कोणत्याही भिखूने 7 घरांच्यापेक्षा जास्त घरी चारिकेसाठी जाऊ नये.
3) कोणत्याही भिखूने एकाच गावात 7 दिवसापेक्षा जास्त राहू नये.
4) एकाच गावात एकापेक्षा जास्त भिखूने राहू नये आणि त्या गावात जीवनात कधीही दुसऱ्यांदा जाऊ नये.
(5)भोजन गृहण केल्यानंतर धम्मदेसना दिल्याशिवाय ते घर सोडू नये.
असे अनेक नियम भगवंतानी भिखू संघांसाठी का लावले असतील? याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला.त्या नियमांची पडताळना त्यांनी त्या काळात केली होती. त्या नियमांच्या 5% टक्के सुद्धा आचरणातून सिद्ध होणारा भिखू संघ नव्हता.म्हणून…
आज 2024 च्या काळातील भिखू संघ तथागतांनी लावलेल्या नियमानुसार आचरणातून सिद्ध होणाऱ्या भिखू संघाला माझे त्रिवार वंदन…
पण आहेत का?असतील तर किती टक्के असतील?
( कदाचित 0•000000001% टक्के अपवाद असतीलही)
परंतू ……
बहुसंख्यांक संघ कसा आहे?याचा विचार आता उपासकांनी करायलाच हवा..
जेंव्हा मेश्राम नावाचा भिखू अमरावतीमध्ये श्रामनेर भिखुनीचा शस्त्राने चिवरावर असतांना धारदार हत्या करतो!
भिखू पंचशीलाच्या शेवटच्याशिलाचे उल्लंघन करतो.
विकाल भोजना वेरमणीचे उल्लंघन करतो.
दानपारमितेशिवाय आमच्या संघाला धम्मदेसना देताच येत नाही.
एक भंतेजी तर 2024 च्या डिसेंबर महिन्यात जय श्रीराम,जय बुद्ध सुद्धा म्हणायला मागे पुढे पाहत नाही.असं हे का घडत आहे.आणि भगवंतानी वरील नियम का लावले असतील?
या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण शोधूया…..
उपासक सुद्धा यामध्ये 100% निर्दोष आहेत असं अजिबात नाही (यामध्ये अनंत भवरे प्रथम दोषी आहेच, तो क्षमाशील नाहीच.)
प्रथम तथागतांनी हे नियम का लावले असतील याचा विचार करू…
1) चे उत्तर :- भिखूने एकाच घरी दुसऱ्यांदा जाण्याने त्या घरच्या भोजनाचा, मोह निर्माण होऊन धम्म कलंकित होण्याची जास्त शक्यता असते.
2) चे उत्तर :- कोणत्याही भिखूने पहिल्या घरी चारिका नाही मिळाली, तर दुसऱ्या घरी जावे, तिथेही नाही मिळाली तर तिसऱ्या घरी जावे. सहाही घरी नाही मिळाली तर शेवटी सातव्या घरी जावे. तिथेही नाही भोजन मिळाले तर आठव्या घरी जाऊ नये.याचा अर्थ 7 घरांनी तुम्हाला ठोकरलेले आहे. तुमची मलीनता सिद्ध झाल्यामुळे तुम्ही ते गाव ताबडतोब सोडून द्यावे.
3) चे उत्तर :- कोणत्याही भिखूने 7 दिवसापेक्षा जास्त एका गावात राहू नये. ते यासाठी की त्या एका भिखुच्या आचरणाच्या कौशल्यातून, त्याच्या धम्मदेशनेच्या कौशल्यातून 8 व्या दिवशी दुसऱ्या गावातील उपासकांना त्याचा लाभ मिळावा. त्याच्यानंतर तिथे येणाऱ्या नवीन भिंतीला तशी संधी मिळते. यातूनच धम्माचा प्रचार आणि प्रसार गतीने होऊन संपूर्ण भारत बुद्धमय करण्यास आपोआपच मदत होते.
4) चे उत्तर :- एकाच गावात 2 किंवा जास्त भिखूने एकत्र राहिल्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जास्त काळ लागेल.दुसरे असे की, धम्मदेशनेचा लाभ उपासकांना वेगवेगळ्या प्रकारे मिळून धम्माची महती साऱ्या विश्वात पोहचून सर्व विश्व् बौद्धमय होईल.
5) चे उत्तर :- भोजन गृहण केल्यानंतर त्या घरी धम्माचे महत्व पटवून देऊन त्या परिवाराला शिलवान बनण्यासाठी कारणीभूत व्हावे.
वरील नियमांचे पालन काटेकोरपणे आमच्या भिखू संघाने केले असते.
तर आज….
आमच्यापर्यंत 100% तर नाही 15/20 टक्के तरी आमच्यापर्यंत धम्म आचरणातून पोहचला असता!
“जेंव्हा तथागत भगवान बुद्ध आणि भन्ते आनंद जंगलातून चालत असतांना,भगवंत झाडाखाली पडलेली काही पाने उचलतात.आणि आनंदाला ती मोजायला सांगतात.आनंदा मोजून ती 7 पाने असल्याचे सांगतात.त्यावर भगवंत म्हणतात,.
“आनंदा,या पृथ्वीवर जेवढी वृक्ष आहेत,त्या वृक्षाना जेवढी पाने आहेत.एवढा हा धम्म अगाध आहे.पण मी तुम्हाला केवळ 7 पाने एवढीच देऊ शकतो.”
आणि या सात पानांपैकी एका पानाचा एक छोटासा तुकडाच आपल्यापर्यंत 2024 पर्यंत पोहोचलेला आहे..
निदान 7 पानांपैकी एका पानाएवढा तरी धम्म आमच्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य भिखू संघाने केले असते…
तर निश्चितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तो हट्ट करण्याची वेळच आली नसती!
तथागत भगवान बुद्धाच्या काळात 99•9999% टक्के भंतेजी अरहंतप्राप्त होते.
पण आज 2024 मध्ये एक सुद्धा बियासाठी सुद्धा का नाही?याचे आकलन उपासक करतील काय?
दुसऱ्यांदा त्याच भंतेजीला आपल्या घरी बोलावून सुद्धा उपासक चुकच करतात.म्हणून उपासक सुद्धा निर्दोष नाहीत .
आणि म्हणूनच वरील नियमांचे उल्लंघन करणारे भिखू हे मनुवादीच आहेत.यांच्यापासून उपासकांनी सावधान राहावे.
आपल्या समाजातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरी भिखू संघ ठाण मांडूनच बसतो. जणूकांही केवळ तिथेच धम्म सांगितला म्हणजे सारा भारतच बुद्धमय होतो.असा भ्रम निर्माण करण्याचे ढोंग आजही संपूर्ण देशात चालू आहे.
म्हणूनच….
मनुवादी चिवरापासून सावधान!
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689