नागपूर प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या आमदारांनी,’ईव्हीएम हटाव संविधान बचावचे,नारे देत पायऱ्यांवर आंदोलन केले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी पहिला वार ईव्हीएमवर केला.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पायऱ्यांवर एकत्र येत,”ईव्हीएम हटाव संविधान बचावचे,नारे देत फलकबाजी केली.
काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर फोडल आहे.
जगातील सर्व प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते.भारताचाही समावेश आता प्रगत देशांमध्ये होत,असे भाजपचे नेते सांगतात.त्यामुळे आपल्या देशातही बॅलेट पेपरवरच मतदान घेतले पाहिजे,अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडली.
ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करणे शक्य आहे.बरेचदा याचे पुरावेही मिळाल्याचा दावा यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांद्वारे करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ करण्यात आला.रात्री उशिरापर्यंत मतदानाचे आकडे घोषित करणे सुरू होते.
त्यानंतरही मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी वेगळेच आकडे समोर आले.त्यामध्ये सात टक्के मतदान बाढलेले दिसले,हे सात टक्के वाढलेले मतदान म्हणजेच मोठा घोळ आहे.
त्यामुळे हे वाढलेले मतदान बोगस असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे,असेही महाविकास आघाडीचे नेते यावेळी म्हणाले.
मारकडवाडीचा पॅटर्न आता देशभर राबवावा लागेल.त्यासाठी नियोजन सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आलेल्या लोकांबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे.बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा निर्णय जर सरकारने केला नाही तर जनता रस्यावर उतरेल असा इशाराही यावेळी विरोधरकांनी दिला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,काँग्रेसचे आमदार भाई जगताप,यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर,उत्तर नागपूरचे आमदार डॉ.नितीन राऊत,आमदार रोहित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारचा आंदोलनात सहभाग होता.