आजाद समाज पार्टी अन्वये चिमूर तालुका अध्यक्ष पदी अमीत भिमटे यांची नियुक्ती….

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

          अमीत हरीदास भिमटे हे समजदार व कार्यक्षम व्यक्तीत्व असल्याने आजाद समाज पार्टी अन्वये चिमूर तालुका अध्यक्ष त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश महासचिव मनिष साठे यांनी केली आहे.

         क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती राजश्री शाहू महाराज,युगपुरुष डॉ.बाबासाहेब यांची विचारधारा आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी आजाद समाज पार्टी चिमूर तालुका अध्यक्षपदी अमीत हरीदास भिमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

           आपल्या नेतृत्वाखाली आजाद समाज पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या अधिक बळकटी मिळेल हा उदांत हेतू स्पष्ट करीत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जाबाबदारी पार पाडण्याचा विश्वास महाराष्ट्र नेतृत्वाने अमीत भिमटे यांच्यावर दाखविला आहे.