दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : चिंतन हे विशाल कर्णिक यांच्या कवितेचे सूत्र आहे. समाज जगवणारा आणि जागवणारा विचार त्यांच्या काव्यातून दिसून येतो. त्यांची कविता माणसाच्या माणूसपणाला साद घालणारी आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक अरुण कुलकर्णी व्यक्त केले.
कवी विशाल कर्णिक लिखित व मधुश्री प्रकाशित “दरवळ कवितांचा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा सेवानिवृत्त शिक्षक अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी तेच बोलत होते.
याप्रसंगी लेखिका व कवियत्री प्रतिभा हंप्रस, पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष संतोष खामकर, डॉ.राजेंद्र झुजारराव, माधुरी इंगळे, प्रकाशक पराग लोणकर आदी उपस्थित होते.
कविता लिहिणे सोपे नाही. कवितेसाठी निष्ठा लागते. ती कवी विशाल कर्णिक यांच्यामध्ये आहे. निसर्गाचा तजेलदारपणा त्यांच्या कवितेत आहे. संग्रही ठेवावा, असा हा कवितासंग्रह सर्वांनी वाचावा, असे प्रतिभा हंप्रस म्हणाल्या. प्रास्ताविक प्रज्ञा कुलकर्णी-कर्णिक, सूत्रसंचालन अनमित्रा देशमुख-निंबाळकर यांनी केले प्राजक्ता कुलकर्णी यांनी आभार मानले.