विरार येथे परभणी घटनेचे पडसाद…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

     परभणी घटनेचा व शहिद सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक‌ १६/१२/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता पोलीस व राज्य शासनाचा निषेध म्हणून म्हणून सर्वसंघटनेच्या वतीने विरार पोलीस स्टेशन समोर मूक आंदोलन करण्यात येणार होते.

          पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला विरोध केला तरी भीमसैनिकांनी या विरोधाला विरोध करून त्याच ठिकाणी पोलीस प्रशासनाचा विरोध करत परभणी घटने संबंधाने आंदोलन केले.

         विरार मधील तमाम आंबेडकरी व संविधानवादी जनतेने राज्य सरकारचा व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येन सहभागी होऊन मोठा प्रतिसाद दिला होता.