एकविरा स्कूल ऑफ विलियंट्स मध्ये कोण बनेगा चॅम्पियन प्रतियोगीतेत क्षमा संघ ठरला अव्वल…

 युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

         स्थानिक दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मध्ये कोण बनेगा चॅम्पियन प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्ग पहिली ते पाचवी मधील एक गट व सहावी ते आठवी मधील एक गट असे खेळाचे वर्गीकरण करण्यात आले होते त्यामध्ये तपस्या, शौर्या, क्षमा, सत्या, असे ग्रुपला नाव देण्यात आले होते.

         एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मध्ये विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम हे नित्य नेमाने राबविले जातात त्यामध्ये या महिन्यातील ही प्रतियोगिता अधिक सरस ठरली कोण बनेगा चॅम्पियन मध्ये सागर श्रीराव यांच्या यशस्वी मार्गदर्शनात कोण बनेगा चॅम्पियन ही स्पर्धा राबविण्यात आली.

         यावेळी शालेय शिक्षकांनी सुद्धा प्रतियोगिता यशस्वी होण्यासाठी हातभार लावले विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर आधारित ही चॅम्पियन स्पर्धा राबविण्यात आली तर्क शुद्धता विचाराची प्रगल्भता व सामान्य ज्ञान परिसरातील घडामोडी व विश्वातील घडामोडी यांचा सुद्धा अभ्यास या प्रतियोगितेच्या निमित्ताने करण्यात आला.

         सदर स्तुत्य शालेय उपक्रम हा राबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक व अभ्यासाविषयीची सामान्य ज्ञान याची रुची निर्माण झाली. यामध्ये दोन्हीही गटामधून क्षमा या गटाचे वर्चस्व सरस ठरले सदर स्तुत्य उपक्रमाचे शाळेचे प्राचार्य लिझेश रामकृष्णन व शालेय विश्वस्त मंडळाकडून कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.