प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
पोष्ट बेसिक शासकीय आश्रम शाळा जांभुळघाट येथील इमारत बांधकामासाठी संबंधित कंत्राटदार हा चोरट्यांद्वारे चोरीची वाळू रात्रोच्या वेळी आणून वापरत असल्याचे प्रकरण नुकतेच पुढे आले.
इमारत बांधकामासाठी जांभुळघाट आश्रम शाळेत चोरीच्या मार्गाने आणलेली वाळू सध्यास्थित झाकून ठेवलेली आहे आणि काही वाळू इमारत बांधकामासाठी वापरण्यात आली आहे.
चिमूर तहसिलदार,जांभुळघाट मंडळ अधिकारी,जांभुळघाट तलाठी यांना सदर चोरीच्या वाळूची माहिती दिल्यानंतर सुध्दा ते अवैध वाळू प्रकरणाकडे लक्ष देताना दिसत नाही.
अधिकारी व कर्मचारी वाळू चोरांचे साथिदार आहेत असे चिमूर तालुक्यातील नागरिकांनी समजायचे काय? “कि,स्थानिक आमदारांच्या दबावात ते वाळूचोर जाधव आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास हिम्मत दाखवित नाही असे समजायचे?
तहसिलदार संबंधित वाळूचोरांवर कारवाई करणार नसतील तर सर्व सामान्य नागरिकांनी,”वाळू व्यवसाय, बिनधास्तपणे तथा खुल्लम खुल्ला का म्हणून करु नये? आणि त्यांना वाळू व्यवसाय करण्यासाठी अडवणारे संबंधित प्रशासन कोण?हा प्रश्न पुढे चालून उपस्थित होवू नये…असेच चिमूर तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.