शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातील नेरी जवळच्या सरडपार शेत शिवारात वाघाच्या दर्शनाने चांगलीच दहशत निर्माण झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून हा पिसाळलेला वाघ या भागातील नदी किनारी ठान मांडुन बसल्याने शेतकरी शेतमजूरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.
वाघाच्या वास्तव्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे जसे की कापूस वेचणी चे कामे, रब्बी हंगामात चना आणि गव्हास पाणी करणे माणसावर हमले करून जखमी करणे अशा विविध घटनांनी पिसाळलेल्या वाघाने शेतकऱ्यांना मजुरांना जेरीस आणले होते. वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेतीची संपूर्ण कामे प्रभावित झाली होती.
वन विभागाला सुद्धा वाघ सरडपार नदीमध्ये बसून असल्याचे निदर्शनास आल्याने यांची दखल घेत वन विभागाची रेस्कु टिम सज्ज झाली आहे.
या पीसाळलेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या ४ मोटार व्हेईकलसह ४० वन कर्मचाऱ्यांचा ताफा कामाला लागला आहे.
ट्रॅप कॅमेरे, जेरबंदीसाठी कठळे लावण्यात आले मात्र वाघ काही पिंजऱ्यात अडकेना तेव्हा वाघाला या भागातुन हुसकावून लावण्यासाठी वनपरिक्षेत्राधीकारी चिमुर क्षेत्र सहाय्यक सि.एन. रासेकर नेरी सर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील रेस्कु टिम तयार करण्यात आले.
वाघांचा बंदोबस्त लावण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सज्ज झाले आहे. असे क्षेत्र सहाय्यक सि. एन. रासेकर यांनी सांगितले आहे.वाघांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.