शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले.विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन असताना,अधिवेशन कालावधी कमी करून वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे.
एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे,सोयाबीन,धानकापसाला हमीभाव मिळत नाही.विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत,पण त्याला या सरकारने हरताळ फासला आहे.
त्यामुळेच शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतले आहे.