पिपरी (देश) येथे १५ व १६ डिसेंबर रोजी पुण्यतिथी सोहळा..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ पुण्यतिथी सोहळा दिनांक १५ व १६ डिसेंबर २०२४ रोजी पिपरी (देश) तालुका भद्रावती येथे आयोजित करण्यात आले आहे.

        त्या निमित्याने बालगोपाल उत्सव समिती अंतर्गत गावात रोज सकाळी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्यावेळी गावातील बालगोपाल मंडळी सकाळी ५ वाजता स्वच्छतेला सुरुवात करत आहे.या मोहिमेचा सर्व स्तरावरून प्रशंसा केली जात आहे.

       वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त गावात विविध भजन मंडळी आपले भजन सादर करणार आहे.गावातून मोठ्या उत्साहात पालखी काढण्यात येणार आहे.

        सध्याच्या काळातील शिक्षण पद्धती व आव्हाने या विषयावर विदर्भातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ चेतन खुटेमाटे व प्रा राजेश पेचे सर हे मार्गदर्शन करणार आहे.४.५८ मिनटानी श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.

        ह.भ. प.सौ जयश्री गावतुरे यांचं कीर्तनाचे रात्री आयोजन करण्यात आले आहे.तसेच १६ तारखेला कीर्तनाचा काला ह भ प आशिष मानुसमारे यांचा कीर्तनाचा काला असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.