युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
1 डिसेंबर पासून राज्यातील पॉश मशिन बंद असल्याचे वितरण व्यवस्था कोलमडली असून सर्व रेशन दुकानांमध्ये मोफतचे धान्य असताना सुद्धा कार्डधारकांना ते मिळत नाही.
रेशन दुकाने केव्हा सुरू होतील अशी विचारणा संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील रेशन डिलर दुकानदारांना कार्डधारक करीत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून याचा फटका महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी 29 लाख 73 हजार 755 कार्डधारकांना फटका बसत आहे.
अमरावती जिल्ह्या मध्ये एकूण 6 लाख 35 हजार 701 कार्ड असून अंतर्गत अंतोदय कार्डधारकांची संख्या 1 लाख 28 हजार 204 एवढी आहे तर प्राधान्य कार्डधारकांची संख्या 3 लाख 74 हजार 974 एवढी आहे हे सर्व कार्डधारकांना महिन्यावारी मोफतचे प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळत असून यामध्ये गहू व तांदुळाचा समावेश आहे.
ज्यांची नावे कार्डमध्ये समाविष्ट आहेत त्यांच्या बोटाचे ठसे रेशनच्या मशिनवर दुकानदारांना घ्यावे लागत असल्याने तांत्रिक अडचणीमुळे पॉस मशिन बंद असल्याने कार्डावरील व्यक्तीचे ठसे कसे घ्यावे असा प्रश्न दुकानदारासमोर निर्माण झाला आहे.
एकाच वेळी काढ धारकांना धान्य द्यावे व त्यांच्या बोटाचे ठसे कसे घ्यावे ही समस्या रेशन चालकासमोर निर्माण झाली आहे. रेशन दुकानात रेशन असून सुद्धा कार्डधारकांना रेशन देऊ शकत नाही त्याचीही केवायसी सुद्धा करता येऊ शकत नसल्याने रेशन दुकानदारासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.