समता नगर येथे भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी… 

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

            भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दर्यापूरच्या वतीने शहरातील समता नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांची जयंती आनंदमय वातावरणात नुकतीच साजरी करण्यात आली.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर रायबोर्डे होते. तर प्रमुख पाहुणे जिल्हा संघटक प्रा. देवराव चक्रे, तालुका सरचिटणीस सुधिर बसवंत माजी तालुकाध्यक्ष रामदास वर्धे , केंद्रीय शिक्षिका संघमित्राताई आठवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड.संतोष कोल्हे हे उपस्थित होते.

            या कार्यक्रमा अंतर्गत ग्रंथ वाचक दादारावजी दूधंडे, मनोहर वानखडे अंजलीताई घनबहादुर कल्पनाताई सावळे, संगीताताई गवई ,सविताताई गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. 

             तर भैय्यासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर संघमित्राताई आठवले यांनी प्रकाश टाकला तर ऍड. संतोष कोल्हे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याचे महत्त्व विशद केले.

             कार्यक्रमाच्या यशस्वी साठी साहेबराव सावळे, अरुण गवई ,विजय दूधंडे इत्यादींनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन नागोराव मोहोड यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मीताई वाघमारे यांनी केले.

          कार्यक्रमाला शहरातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.