शुभम गजभिये
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर येथील सिद्धिविनायक नगरी तथा बोलधने ज्वेलरी नेरी चे ऑनर आशुतोष बोलधने यांचा वाढदिवस दिनांक १४ डिसेंबर असताना त्यांनी आपल्या कुटुंबिय तथा मित्र मंडळी सोबत राष्ट्रसंत तुकडोजी मूक बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वेटर व टोपी भेट दिली.मुके बधिर विद्यार्थ्यांत आनंद दिसून आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आशुतोषजी बोलधने यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दिल्या.
यावेळी चिमूरचे प्रॉपर्टी डीलर विजय बचाटे यांनी सुद्धा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बोलधने कुटुंब व मित्र मंडळींची उपस्थित होती.