रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून अर्चना वंजारी नुकत्याच रुजू झाल्यात.त्यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत करण्यात येत आहे.
भाजयुमो चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर यांनी सहकाऱ्यांसोबत मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांची भेट घेत पुष्पगुछ देऊन त्यांचे स्वागत केले.
चिमूरच्या पाणी स्वच्छता आदी समस्यावर चर्चा करण्यात आली.समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी वंजारी यांनी दिले.यावेळी श्रेयस लाखे,अमित जुमडे,राकेश भोयर,मंगेश भुसारी आदी सहकारी उपस्थित होते.