रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड होत्या.त्यांची बदली झाल्यापासून प्रभारी कार्यभार कंकाळ यांच्याकडे होता.आता नियमित मुख्याधिकारी अर्चना वंजारी रुजू झाल्या आहेत.
दरम्यान,मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे रोटरी क्लब च्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत केले.यावेळी नगर परिषद व रोटरी क्लबच्या वतीने कोणकोणते उपक्रम राबविता येईल यावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी स्वागत करताना रोटरी क्लब सेक्रेटरी कैलास धनोरे,डॉ.महेश खानेकर,राकेश बघेल,करण चावरे उपस्थित होते.