बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
श्री गुरु बापूसाहेब देहुकर व गुरुवर्य सोहम महाराज देहुकर यांच्या मार्गदर्शना खाली व पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह असून.
गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी 80 वर्षाचा योद्धा गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांची संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत कीर्तन सेवा झाली.
किर्तन सेवे प्रसंगी गुरुवर्य बंडातात्या कराडकर बोलत आसताना म्हणाले की, माझ्या तरुण बांधवांनी व्यसनाहारी न जाता भगवंत चरणी नतमस्तक होऊन परमार्थ करावा.
व्यसन मुक्ती झाली तर संस्कार चांगले घडतील, येणारी पुढची पिढी निरोगी राहून भक्ती मार्माला जातील. त्यामुळे पती-पत्नीत भांडण न होता जीवनात चांगले संस्कार घडतील.
लहान बालकाला चांगले विचार व संस्कार द्या. त्याच्या जीवनाच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही,पिंपरी बुद्रुक येथील सप्ताहातील किर्तन सेवे प्रसंगी गुरुवर्य बंडातात्या कराडकर, यांचे उद्गार..
वय वर्ष 80 वयाचा योद्धा आसताना जीवनामध्ये परमार्थ आणि नामाची सांगड मनापासून आसून धार्मिक क्षेत्रातील शिदोरीची सांगड आयुष्यभर मनामध्ये आहे. शरीर साथ देत नसताना सुद्धा कीर्तन सेवा करण्याची आवड आहे.
ज्या माणसाने आयुष्यभर जीवाच रान करून भगवंताच नामस्मरण व सतत परमार्थ असून सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये व्यसनमुक्ती संघटना निर्माण करून या संघटनेच्या मार्गदर्शनाने लाखो तरुण व्यसना पासुन मुक्त झालेले आहेत. वय वर्ष 80 असून सुद्धा देहू ते पिंपरी बुद्रुक 200 किलोमीटर प्रवास करून अखंड हरिनाम सप्ताहाच्या किर्तन सेवेला पिंपरी बुद्रुक येथे हजेरी लावली.
गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या कीर्तन सेवेसाठी 250 टाळकरी व 4000 हुन अधिक भाविक भक्त व ग्रामस्थ यांनी हाजर होते.
टाळकरी मृदुंग वादक विणेकरी पिंपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व अनेक भागाभागातून आलेले भाविक भक्त भजनी मंडळ यांनी उपस्थित राहून कीर्तन सेवा व महाप्रसादचा आस्वाद घेतला.
अखंड हरिनाम सप्ताहाचे सूत्रसंचालन ह भ प महेश सुतार यांनी केले.