परभणी प्रकरणातंर्गत बेकसूर युवक-कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे :- भिमप्रतिष्ठान लातूर पदाधिकारी.. — संविधानाचा अपमान करणाऱ्या आरोपींचा लवकर शोध का म्हणून लागत नाही?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

         परभणी येथे संविधानाचे प्रतिकृतीचा तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करून यामागील षडयंत्रखोर कोण आहेत त्यांचा शोध घ्यावा व कठोर कारवाई करावी या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी लातूर यांना भिमप्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांद्वारे देण्यात आले. 

             संविधान प्रतिकृतिचे केलेला अपमान सहन न झाल्याने कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून कोंबिंग ऑपरेशन द्वारे निष्पाप तरुणांचे सुरू केलेले अटक सत्र थांबवून गुन्हे माघार घ्यावे या मागणीसाठी भिमप्रतिष्ठानच्या वतीने आज जिल्हाधिकारी सांगली यांचे मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

        यावेळी संस्थापक अध्यक्ष मा-चेतन (भाऊ) कांबळे, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मा-कविष (kk) कांबळे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा-स्वप्निल (बाबा) खांडेकर, महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सचिव मा-अक्षय(भाऊ) माने,जिल्हाध्यक्ष मा-देवा (भाई) कांबळे, मा-सिध्दांत धोतरे,मा-अरबाज शेख,मा-गौरव सरवदे मा-वासु कांबळे,मा-अक्षय बनसोडे व अन्य भिमप्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते..