ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- आजाद समाज पार्टी च्या वतीने 8 डिसेंबर रोजी आरमोरी येथील मारकवार फार्म हाऊस येथे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर मंथन, समीक्षा तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत रणनीती या विषयावर एक दिवसीय कार्यकर्ता राजकीय शिबीर पार पडला.
शिबिराच्या सुरुवातीला सामाजिक व आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक जयकुमार मेश्राम यांनी राजकीय चळवळीत तरुणांची भूमिका व धोरण या विषयावर गंभीर मार्गदर्शन केले आणि देशात काम करणाऱ्या एकही वैचारिक संघटना, पक्ष आर्थिक बजेट वर प्रश्न उपस्थित करीत नाही असा आरोपही केला.
रस्ते, बांधकाम क्षेत्रावर 11 टक्के बजेट सरकार मांडते आणि शिक्षण क्षेत्रावर 2.6% बजेट मांडल्या जातो तरीही आम्ही या विरोधात आवाज उचलत नाही. बेरोजगारांना अनेक रोजगार आताही उपलब्ध करून देता येतात पण त्याकडे चळवळीत मंथन होत नाही.
नौकरदार वर्ग आरक्षण आणि पेन्शन याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रश्नांवर बोलत नाही, तेच आंदोलन म्हणजे त्यांना चळवळ वाटते. मुळात चळवळ चालवीणारे लोकांचे पोट भरले असल्याने त्यांना इतर प्रश्न दिसत नाही. आपले प्रश्न, आंदोलनाची दिशा आता बदलण्याची गरज असल्याचे जयकुमार मेश्राम यांनी सांगितल.
दरम्यान फुले आंबेडकरी राजकारणात ओबीसिंची भूमिका व सहभाग या विषयाला घेऊन एएसपी चे युवा नेते दिनेश देशमुख, चळवळीतील महिला सहभाग व भूमिका या विषयावर तारका भडके, ऍड. सोनाली मेश्राम यांनी प्रकाश टाकला तर आदिवासिंच्या भूमिकेवर एएसपी कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी मार्गदर्शन केले. आरमोरी विधानसभा उमेदवार चेतन काटेंगे यांनी आपले निवडणुकीतील अनुभव व अडचणीवर प्रकाश टाकला.
पक्षाच्या ध्येय धोरण व आगामी रणनीती संदर्भात पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.
शेवटी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी निर्देश देत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका जाहीर केली असून जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच जागा लढण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी करावी असे कार्यकर्त्यांना सांगितले.
शिबिरा दरम्यान 20 उमेदवार जाहीर करण्यात आले व पक्षाचे सर्वच प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणाच्या ठराव पास करण्यात आला.
20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा, शिक्षण व्यवस्था, शालेय इमारती चे विदारक चित्र यावर निषेध प्रदर्शनी घेऊन लवकरच सरकारपुढे शिक्षण बजेट, आरोग्य बजेट यावर लक्ष वेधणार आहे. पक्षात तरुण व सुशिक्षित चेहऱ्यांना जास्तीत जास्त संधी देण्यात येईल असे विविध ठराव मंजूर करून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले.
शिबिराला जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, संघटक हंसराज उराडे, आदिवासी आघाडी अध्यक्ष जगदीश कन्नाके, गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, वडसा तालुकाध्यक्ष बबन रामटेके, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, चामोर्शी कार्याध्यक्ष उत्तम कोवे, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, राहुल कुकुडकर, स्वाती खोब्रागडे, पौर्णिमा शेंडे, अंकुश रामटेके आदी कार्यकर्ता उपस्थित होते.
आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीं सहारे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष ऍड. नर्गिस पठाण, शहराध्यक्ष नितीन भोवते, युवा आघाडी अध्यक्ष शुभम पाटील, तालूका सचिव सुरेंद्र वासनिक, ऍड. राज सुखदेवे यांनी शिबिराचे यशस्वी आयोजन केले
सतीश दुर्गमवार
जिल्हा मिडीया प्रभारी
एएसपी गडचिरोली यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.