शुभम गजभिये
विशेष विभागीय प्रतिनिधी…
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत मौजा सातारा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या ग्राम पंचायतींची विभागस्तरीय समितीद्वारे तपासणी गावातील स्वच्छता,गटारे,सांडपाणी व्यवस्थापन,घनकचरा व्यवस्थापन,शाळा,अंगणवाड,वाचनालय,व्यायामशाळा,क्रिडांगण,नाडेप खड्डे,शौचालय, कामे पाहण्यात आले.
याप्रसंगी विवेक इलमे उपायुक्त अस्थापना तथा समिती अध्यक्ष,कमलकीशोर फुटाणे उपायुक्त विकास तथा समिती सचिव,बेले अधिक्षक अभियंता तथा सदस्य,छत्रपाल पटेल सहाय्यक गटविकास अधिकारी,अमोल महल्ले विस्तार अधिकारी,ग्रामपंचायत सरपंच गजानन गुळधे,ग्रामपंचायत उपसरपंच वर्षा नन्नावरे, जे.आर.गुप्ता ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी,सदस्या आशिना नन्नावरे,वामन बावणे,शालू नन्नावरे,सुषमा नैताम,तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, विविध समित्याचे पदाधिकारी व ग्रामवासीय उपस्थित होते.