सालमारा येथे केंद्रस्तरीय बालक्रीडा व कला संमेलनाचे थाटात  उद्घाटन…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी : शारीरिक तंदुरूस्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने खेळात सहभागी होऊन खेळ खेळावे, तसेच निरोगी आरोग्य व विकासासाठी खेळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्र.सरपंच संदीप ठाकूर  यांनी केले.

         आरमोरी पंचायत समितीच्या समूह साधन केंद्र जोगीसाखरा अंतर्गत येणाऱ्या सालमारा येथे बालक्रीडा व कला संमेलनाचे आयोजन १२,१३ व १४ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी सालमारा येथील पटांगणावर झाले. यावेळी ते बोलत होते.

        याप्रसंगी उद्घाटक म्हणून गावचे प्रतिष्ठित काशिनाथ नारनवरे हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून  पत्रकार प्रवीण रहाटे, पत्रकार भीमराव मेश्राम,पत्रकार ऋषी सहारे, ज . ने. विद्यालयाचे प्राचार्य कृष्णा खरकाटे, वनरक्षक शिवूर्कर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधव नारनवरे, केंद्र प्रमुख कैलास टेंभूर्ने , विनोद करकाडे, गंगाधर कुमरे ,अशोक प्रधान, उदाराम दिघोरे, उपस्थित होते.

       प्रास्ताविक केंद्र प्रमुख कैलास टेंभूर्णे  यांनी केले. संचालन सुनील पणघांटीवार तर आभार क्रीडा केन्द्र अध्यक्ष आनंद हेमके यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पुरुषोत्तम शेंडे, निकेश बंसोड, प्रीती रामटेके, अंवर शेख, गायत्री वालदे , सुरेश वाटगुरे,शिलार, रत्ना बडकेलवर तसेच शाळेच्या मुख्याध्यापक व साहाय्यक शिक्षकांनी सहकार्य केले.

       दुपारी चार वाजता गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे यांनी भेट घेऊन सलमारा येथील गावकऱ्यांचे आभार मानले व नियोजनाची स्तुती केली.