
अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही :- जनहित फाउंडेशन यांनी दिनांक ११ डिसेंबर २०२४ ला तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच तालुक्यात ग्रामीण भागातील गावांमध्ये अर्थातच झाडीपट्टीत माहे-जानेवारी,फेब्रुवारी,मार्च व इतर महिन्यात मंडई व बैलांच्या जंगी इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात येते.त्याच निमित्ताने नाटकांचे सुद्धा आयोजन करण्यात येते.
अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या सार्वजनिक समारंभातून खर्राच्या प्लास्टिक,पाणी बाटल, ओला कचरा,सुखा कचरा,यासारख्या कचऱ्याची निर्मिती होते.मात्र यावर नियंत्रणासाठी व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी संबधित आयोजकांनी करायला पाहिजे.पण तसे होतांना दिसत नाही.
सदर कार्यक्रमांच्या परिसरात कचरा हा तसाच पडलेला असतो नंतर तो नैसर्गिक वाऱ्याने उडून कुठल्याही शेतजमिनीत व जंगल परिसरात,गावाशेजारी जातो.त्यामुळे शेत जमिनीला,जंगल परिसरातील प्राण्यांना,मानवाच्या आरोग्याला सुद्धा त्याचा धोका आहे.
तेव्हा आपण अश्या कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देतांना परवानगी पत्रात कचरा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक समारंभात व मंडईत,शंकरपटात लागणाऱ्या दुकानात कचरापेटी व कचरा गाडीची व्यवस्था आयोजकांनी करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अन्यथा त्यांनी उचित कारवाईस पात्र राहतील अशी सक्त ताकीद व परवानगी परिपत्रकात नमूद करून यावर तात्काळ अंमलबजावणी करावी.
तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संबधित सर्व ग्राम पंचायत तसेच आपल्या स्तरावरील सर्व विभागांना सूचना व आदेश पारित करावा,असे नमूद केले आहे.
निवेदन देतांना प्रामुख्याने आक्रोश खोब्रागडे अध्यक्ष,विशाल गेडाम उपाध्यक्ष,तथागत कोवले सचिव,सत्यपाल मेश्राम,रितेश सूर्यवंशी,वीरेंद्र मेश्राम,किशोर बोरकर व इतर सहकारी उपस्थित होते.