दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गीता जयंतीच्या निमित्ताने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प.रामेश्वर भोजने, माणिक देशपांडे, सतीश नांदुरकर, प्रशांत रमेश घुंडरे, अजित वडगावकर, डाॅ.दिपक पाटील, अनिकेत उपासे, प्रदीप काळे, विवेक चव्हाण, कामिनी मुंडे, अनुजा साळवे, चंद्रकांत भालेकर, संतोष इंगळे, शिक्षक,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविका मध्ये मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी क्रीडा सप्ताहात विविध स्पर्धा संपन्न होतील असे सांगितले.
रामेश्वर भोजने यांनी प्रार्थनेने मन सुदृढ होते, क्रीडेमुळे माणसाचे मन, मनगट, मेंदू , सक्षम होतो असे सांगत प्रशालेमध्ये संत विचारांची शिकवण दिली जाते असे सांगितले.
माणिक देशपांडे यांनी चिमुकल्या खेळाडूंचे कौतुक करत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.सतिश नांदुरकर यांनी एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम पोलिसांच्या वतीने प्रशालेत राबविण्याचे आश्वासन दिले.
प्रशांत घुंडरे यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी शरीर सुदृढ ठेवणे ही आजच्या काळात गरज आहे तसेच कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल, टी.व्ही.पासून दूर राहत, बाहेरचे पदार्थ खाणे टाळून अभ्यासाबरोबरच व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी व पालकांनी विशेषत लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.
अजित वडगावकर यांनी प्रशालेच्या कामकाजामध्ये विदयार्थांच्या शिस्ती करिता पोलिसांचे सहकार्य लाभते, शाळेचा माजी विद्यार्थी प्रशांत उच्चशिक्षित असून सुद्धा आज राष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये अनेक पुरस्कार मिळवतो, युवकांमध्ये याची जागृती करतो व समाज आरोग्य सुदृढ रहावे म्हणून जिमची ऊभारणी करतोय याचा अभिमान व आनंद आहे असे सांगत स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांचे आभार प्रतिभा भालेराव यांनी मानले.सूत्रसंचालन वर्षा काळे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निशा कांबळे, वैशाली शेळके, राहुल चव्हाण यांचे सहकार्य लाभले.