
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल केला नाही.विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल,असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष नेतेपद देण्याची भाजपची तयारी आहे का? देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपद देण्याची तयारी असेल,तर आम्ही नाव देऊ.असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाष्य केले आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही.त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हेच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतील,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीची सांगितले होते.
विरोधीपक्ष नेते पदासाठी महाविकास आघाडीकडून अद्यापही अर्ज गेलेला नाही. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले.हिवाळी अधिवेशानामध्ये आमची एकत्र बैठक होणार आहे.चर्चा करून विरोधीपक्ष नेते पदासाठी नाव देऊ, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, विरोधी पक्ष नेतेपद देण्याची भाजपची तयारी आहे का? देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपद देण्याची तयारी असेल, तर आम्ही नाव देऊ. पूर्वी नाव देऊन काही उपयोग नाही. कारण आमचे संख्याबळ तेवढे नाही. आम्ही नाव द्यायचे आणि त्यांनी नकार देऊन तोंडघशी पाडायचे, यापेक्षा मुख्यमंत्र्यांना विचारुन नाव देणार तर संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की,उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनासाठी जाणार आहे.ते नागपुरात मविआच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.