चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
स्थानिक माडगी, तालुका भंडारा येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेच्या वतीने दोन दिवसीय नागदिवळी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माडगीचे सरपंच गजभिये होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समर्थ महाविद्यालय, लाखनीचे प्रा. डॉ. बंडू चौधरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ. डोंगरे, जिल्हा परिषद सदस्या सौ.अस्मिता डोंगरे, लोकशाहीर कलामंच वरोराचे संचालक विलास चौधरी, चक्रधर गोस्वामी, नागपूर आणि माडगी ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस पाटील, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बंडू चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नागदिवळी हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो परिवर्तनाचा उत्सव आहे. माना जमातीच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरांचा तो प्रतीक आहे.”
जिल्हा परिषद सदस्या सौ. अस्मिता डोंगरे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसाठी मदतीचे आवाहन केले आणि या महोत्सवातून जमातीचा इतिहास, संस्कृती तसेच शिक्षणाच्या समस्या उलगडत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन दीलेश्र्वरी ढोणे यांनी केले, तर प्रास्ताविक रोहित ढोणे यांनी मांडले. आभार प्रदर्शन नामदेव घोडमारे यांनी केले. या उत्सवात सर्व जमातीचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
नागदिवळी महोत्सव केवळ सांस्कृतिक उत्सव नसून, परिवर्तनाची प्रेरणा देणारा आणि जमातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम ठरला आहे.