दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
विधानसभेचे मैदान जिंकल्यानंतर आझाद मैदानावर नुकताच शपथविधी सोहळा पार पडला आणि त्यांचा महाराष्ट्र राज्याचे सुत्रधार म्हणून कार्यभाग सुरू झालाय.
यामुळे महायुती अंतर्गत तिन्ही पक्षांनी निवडणूक काळात मतदारांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास प्राधान्यक्रम देताना विशेषतः शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करण्याची मागणी युवा सामाजिक कार्यकर्ता शुभंम विजय गजभिये यांनी केली आहे.
बळीराजाला अस्मानी संकटातून बाहेर काढण्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांची आहे.
निवडणूक दरम्यान महायुतीच्या अनेक उमेदवारांनी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा घोषणा केल्या होत्या.आता सरकार स्थापन झाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस शेतकऱ्यांच्या समस्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार काय?हा यक्ष प्रश्न आवर्जून उपस्थित होतो आहे.कोणतेही निकष व कोणत्याही अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी याबाबत शेतकरी प्रतिक्षेत आहेत.
सरकार पुन्हा सत्तेत आले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे हे आश्वासन दिले होते,हे आश्वासन सरकारने तत्काळ पुर्ण करावे व शेतकऱ्यांच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी करावे.
सरकार समोर अनेक आवाहने असले तरी,आश्वासनांची पुर्तता करण्यावर सरकारने ठाम राहिले पाहिजे,असे मत शुभम गजभिये यांनी व्यक्त केले आहे.
प्रचारा दरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करतांना राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी सोबतच सोयाबीनचा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये तात्काळ लागू करावा अशी मागणी सुध्दा त्यांनी केली आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकार दोन्ही निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करेल,अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे.शेतकऱ्यांनी गरजेपोटी कमी भावात सोयाबीन विकले आहे.सर्वेअंती त्यांना सहा हजार रुपये क्विंटल प्रमाणे रुपये देणे आवश्यक असल्याचे मत शुभंम गजभिये यांचे आहे.