1120 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

       सावली तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाचे बांधावर तूर पिकाची लागवड दुय्यम पिक म्हणून मोठ्या प्रमाणात केल्या जाते. सन 2024 खरीप हंगामात 1120 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड भात बांधावर करण्यात आली.

         सुरवातीचे पर्जन्यमान चांगले असल्यामुळे पिक वाढीचे अवस्थेत चांगले वाढले. काही शेतकऱ्यांनी कृषि विभागाचे मार्गदर्शनात पिकाचे शेंडे खुडल्याने अधिक फुटवे व फांदया येऊन उत्पादन चांगले येण्याचे अंदाज होते.

           मात्र मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व ढगाळ वातावरणामुळे सद्या स्थितीत फुल बहारावर असलेल्या तुरीचे पिकावर पाने फुले गुंडाळणारी आळी, पाने फुले खाणारी आली, शेंगा व दाणे पोखरणारी आळी, पिसारी पतंगाची आली व मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

         आधीच भात परिपक्वतेच्या अवस्थेत लष्करी आळीच्या प्रादुर्भावणे हातबल झालेला शेतकरी, तूर पिका सोबतच नुकतेच पेरणी झालेल्या मका, हरभरा, लाख, पोपट, उळीद, मुंग,मसूर, जवस, ज्वारी व मिरची तसेच भाजीपाला या रब्बी पिकावर बदलत्या वातावरणाच्या विपरीत परिणामामुळे अधिकच हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.

          वातावरणीय बदल व ढगाळ वातावरण यामुळे तूर व रब्बी पिकावर होणारे विपरीत परिणाम जसे फुल व फळ गळ, पाने व फळे खाणारी आली, यांचे व्यवस्थापना करीता..

          पहिली फवारणी काळी अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्क + एन्डोसुल्फान 35 ई. सी.10 मिली. किंवा एन्डोसुल्फान 35 ई. सी.20 मिली. किंवा क्लारोपायरीफोस 20 टक्के 30 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून…

         दुसरी फवारणी 50 टक्के फुलोरा अवस्थेत कयनॉलफॉस 25 ई. सी. 16 मिली किंवा फेंथोएट 50 ई. सी. 14 मिली किंवा ट्रायझोफॉस 35 ई. सी. + डेल्टामेथरीन 1 टक्के 25 मिली किंवा इमामॅमेक्टिन बेनझोट 1.60 ग्राम 10 लिटर पाण्यातून फवारण्याचा सल्ला मंडळ कृषि अधिकरी दिनेश पानसे यांनी दिला आहे.