संत ज्ञानेश्वर माऊली समाधीवर प्रक्षाळपूजा उत्साहात संपन्न… 

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८वा समाधी सोहळा नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्तिकी यात्रेमध्ये लाखो भाविकांनी संत ज्ञानेश्वर समाधीचे दर्शन घेतले. त्यानिमित्ताने शिणवटा काढण्यासाठी कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. माऊलींच्या समाधीवर गरम पाणी व दह्यादुधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला.

          देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. यासाठी आज सकाळी ११ वाजेपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर समाधीला चोळून दर्शन घेत होते. 

            संत ज्ञानेश्वर संजीवन समाधीवर भाविकांच्या वतीने अभिषेक आळंदी देवस्थानने बंद केल्याने फक्त माऊलींचे दर्शन घेतले जायचे माऊलींना पाणी घालवे व अभिषेक केला जावा अशी इच्छा अनेक भाविकांची असते ती इच्छा आज प्रक्षाळ पूजाने परीपुर्ण झाली देवस्थानच्या वतीने यावेळी योग्य नियोजन केल्याने अधिकाधिक भाविकांना व आळंदीकर ग्रामस्थांना प्रक्षाळपूजाचा लाभा घेतला असल्याचे मंदीर समितीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले आहे.