बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
चालू वर्षी उशिरा साखर कारखाने चालू झाल्यामुळे ऊस वाहतूक करण्यास नुकतेच साखर कारखाने चालु झाल्यामुळे वाहतूकदार ट्रॅक्टर ड्रायव्हरची धावपळ चालू झाली आहे. मेघराजाने साथ दिल्यामुळे यंदा उसाची पिके चांगलीच आल्यामुळे वाहतूक करणारा ड्रायव्हर व वाहन मालकाला दिवाळी असल्याप्रमाणे वाटू लागलेले आहे.
कारखान्यांच्या नियमा बाहेर ऊस वाहतूक ड्रायव्हर करीत आहे.दोन ट्रॉलीमध्ये जास्त प्रमाणात ऊस वाहतूक चालू आहे 30 टना पासून ते 40 टन पर्यंत उस वाहतूक ड्रायव्हर करीत आहेत. आशा प्रकारे ऊस वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर वर साखर कारखान्याने दंडात्मक कारवाई व दोन दिवसाची गैरहजेरी लावावी.या परिसरातील ग्रामस्थांची मागणी.
दोन ट्रॉली ऊस भरून बावडा नजीक नरसिंहपूर राज्य मार्गावरून ऊस वाहतूक करीत असताना पाठीमागील येणाऱ्या वाहनांवर जाऊन एक्सीडेंट झाला तर याला जबाबदार कोण,आसेल साखर कारखाना जबाबदार का ऊस वाहतूक करणारा ड्रायव्हर का वाहन मालक, यापैकी कोण असेल जनतेतुन चर्चेला सुरुवात.
जास्त ऊस घेऊन अवजड वाहतूक चढावरून करीत आसताना आनेक प्रकारे धोके होत असतात.डाबर तूट, ब्रेक फेल, टायर फुटणे, पंमचर होणे, ऊसा सहीत ट्रॉली पलटी होणे, असे अनेक जीवघेणा प्रकार घडतो असा अनार्थ टाळण्यासाठी साखर कारखान्याने जी नियमावलीची अट घालून दिलेले आहे. त्या नियमाचे पालन करून ऊस वाहतूक ड्रायव्हर व वाहन माल यांनी नियमावली पाळुन ऊस वाहतूक करावी म्हणजे आशा प्रकारे कोणताही धोका होणार नाही.
वाहतुकीच्या नियमाचे पालन जो ड्रायव्हर पाळत नसेल त्या ऊस वाहतूक ड्रायव्हर वर दंडात्मक कारवाई व्हावी व दोन दिवसाची गैरहजरी लावावी. या भागातील ग्रामस्थ व वाहतूकदार या सर्वांमध्ये चर्चेला उदान आले आहे.
चौकट
साखर कारखान्याच्या नियमबाह्य वाहतूक जो ड्रायव्हर करीत असेल तर त्याच्यावर साखर कारखान्याने दंडात्मक कारवाई करावी व दोन दिवसाची गैरहजरी लावावी.
चौकट
साखर कारखान्याचा नियम सोडून अवजड पद्धतीने ऊस वाहतूक ड्रायव्हर करीत असताना अशा घटनेला जबाबदार कोण? ड्रायव्हर करून घडणाऱ्या घटनेला जबाबदार कोण?