ब्रेकींग न्यूज… — रुद्रपूर वळणावर ट्रॅक्टरची दुचाकीला धडक… — १ मृत्यू , २ जखमी….

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        सावलीवरून आठवडी बाजार करून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने दुचाकी स्वाराचाजागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ७.००वाजताच्या दरम्यान घडली. जखमीना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून उपचार सुरू आहे.

  मृतक ज्ञानदेव मधुकर भोयर

          तालुक्यातील पारडी येथील ज्ञानदेव मधुकर भोयर २६ वर्ष,असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून,गंभीर जखमीमध्ये पुनिदास वासुदेव मडावी(४५),वामन नारायण गेडाम(५७)हे सर्व रुद्रपूर येथील आहेत.

           सकाळी शेतातील धानबांधणी करून सायंकाळी ७.००वाजता आठवडी बाजार करून गावाकडे परत जात असताना रुद्रपूर फाट्याजवळ वळणावर वेगवान ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.

          जखमीना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून पुढील तपास सावलीचे ठाणेदार प्रदीप पुलावर यांच्या मार्गदर्शनात सावली पोलीस करीत आहेत.