सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
शासनाकडून दिलेल्या शालेय पोषण आहारामधुन पारडी येथील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना (दि.५) गुरुवारी रोजी घडली. यात साधारणत ४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असुन आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व विषबाधीत विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये १३३ पटसंख्या असुन घटनेच्या दिवशी १२६ विद्यार्थी हजर होते. दिनांक ४ रोजी शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उखडलेला चणा, तिखट व मिठ लावून दिलेले होते. परंतु दिलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रोच्या वेळेस उलटया, हगवण व ताप येणे सुरु झाले.
परंतु व्हायरल फेवर मुळे ताप आलेला असेल या उद्देशाने पालकांनी पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नाही. दिनांक ५ रोजी विद्यार्थी शाळेत आले त्यावेळेसही विद्यार्थी उलटया करीत असल्याने काही विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले.
लक्षणांवरून विषबाधा झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावली येथे तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध करुन विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत असले तरी या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे.
सदर पोषण आहार हा ऑक्टोंबर महिण्याच्या १७ तारखेला शाळेला प्राप्त झाल्याची माहिती आहे. दोन महिण्यापुर्वीचा पोषण आहार असल्याने विद्यार्थ्यांना उलटया, हगवण व ताप आल्याची प्राथमिक आहे. त्यामुळे यात दोषी आढळण्याऱ्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केल्या जात आहे. दरम्यान विवेक जांसन मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली.
कोट
शासनाच्या पोषण आहारामधुन विद्यार्थ्यांना हगवण, उलटी व ताप आल्याने विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विद्यार्थ्यावर उपचार करण्यात येत असुन निदानानंतर विषबाधा निघाल्यास दोषीवर कारवाई करण्यात येईल.