बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे गावच्या वतीने सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह व गाथा वाचन रविवार दिनांक 8 /12 /2024 पासून सकाळी प्रारंभ होनार आहे.
तुकाराम महाराज गाथा पूजन, झेंडा पूजन, विना ,टाळ, मृदुंग, पूजन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर , गुरुवर्य सोहम महाराज देहुकर यांच्या हस्ते व पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे.
रविवार दिनांक 8 /12/ 2024 पासून ते 15 /12 /2024 पर्यंत रोज सकाळी काकडा आरती दुपारी गाथा भजन सायंकाळी 4 ते 6 वाजता हारीपाट व संध्याकाळी नित्यनेमाने 7 ते 9 कीर्तन सेवा व रात्रभर हरिजागर हे सर्व कार्यक्रम होणार आसून, प्रत्येक दिवसाला रोज नित्यनेमाने व्यवस्था व सर्व सुविधा पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त, व ग्रामस्थांच्या वतीने दररोज लागणारा चहा, अल्पोहार , महाभोजन, फुल हारांची व्यवस्था, रांगोळी, रोज लागणारे श्रीफळ, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंडप स्टेज व डेकोरेशनही आणि स्वयंपाक साठी आचारी सेवा ही नियमाप्रमाणे सर्व काही व्यवस्था असतेच.
परंतु श्री गुरुदत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने चौथ्या वर्षीही साजरा होनार आहे.
तरी या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक महिला तरुण वर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे या निमित्त पिंपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने सांगण्यात आले.