देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आळंदीत भाजपाचा जल्लोष…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळविलेल्या ‌‘महायुती’ सरकारचा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाला. हा सोहळा आळंदी भारतीय जनता पार्टिच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयात स्क्रीन वरुन पाहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर महाद्वार चौकात फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटप करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

          भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कार्यालयात शपथविधी सोहळा स्क्रीन उपलब्ध करण्यात आला होता. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी उभे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाव घेताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला. भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टिचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. तसेच फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.

          यावेळी शहर संघटक ज्ञानेश्वर बनसोडे, युवा मोर्चा अध्यक्ष वासुदेव तुर्की, महीला मोर्चा अध्यक्ष संगीता पफाळ, आकाश जोशी, चारुदत्त प्रसादे, संकेत वाघमारे, संपतराव बवले, सुजीत काशीद, शंतनू पोफळे, प्रमोद बाफना तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.