देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ… — एकनाथ शिंदे व अजीतदादा पवार उपमुख्यमंत्री… — आझाद मैदानावर पार पडला शपथविधी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

            मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल यांनी मंत्री पदांची व गोपनीयतेची शपथ दिली.शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरुवात झाली.

        देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

        या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,संरक्षण मंत्री राजनाथसिंह,गृहमंत्री अमित शहा,रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान,भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा,व भाजपा आणि भाजपा समर्थीत राज्याचे मुख्यमंत्री,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शपथविधी मंचावर उपस्थित होते.

          अभिनेता शाहरूख खान,अभिनेता सलमान खान,प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सह अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

           लाखो मतदारांच्या उपस्थितित पार पडलेला अल्प मंत्र्यांचा आजचा शपथविधी सोहळा अभुतपुर्व असाच ठरला.