ईव्हीएम व रुपयांच्या महापूर विरोधात बीआरएसपी लढा उभारणार :- डॉ.सुरेश माने यांचा जाहीर इशारा… — निवडणूक आयुक्तांनी इतर अयोग्य घटनांसह वाटण्यात आलेल्या अमाप काळे रुपये कुणाचे होते याबाबत विवरण मतदारांना द्यावे…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादीका 

         महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत अमाप रुपयांचा महापूर झाल्याने,लोकांचा स्वतंत्र व निःपक्ष निवडणुका यावरील विश्वास कमी होत असून निवडणुकांमध्ये काळ्या पैशांचा महापूर व निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरवापर यांना रोखण्यात भारतीय निवडणूक आयोग यंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरलेली आहे.

        या विरोधात राज्यघटना व लोकशाही रक्षणासाठी बीआरएसपीतर्फे राज्यात व दिल्लीत आगामी दिवसात पक्षातर्फे तीव्र जनआंदोलन केले जाईल,असा जाहीर ईशारा बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांनी बीआरएसपी अन्वये विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या निवडणूक आढावा बैठकीत दिला. 

         सदर बैठक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉन आवळे चौक,लष्करीबाग येथे संपन्न झाली. 

        बीआरएसपीचा निवडणुकीतील सहभाग व अपयश याची समीक्षा करतांना डॉ.सुरेश माने यांनी असमाधान व्यक्त करून पक्ष संघटना यंत्रणेची पुनर्रचना करून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासंबंधाने बीआरएसपीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन केले. 

       याशिवाय निवडणुकीतील गैरप्रकाराचे विश्लेषण करताना राज्यात महाविकास आघाडीला फाजील आत्मविश्वास नडला तर लहान- लहान राजकीय पक्षांना या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांनी मिळून संपविण्याचे कटकारस्थान केले असाही आरोप डॉ.सुरेश माने यांनी केला. 

         पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी नेत्यांकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी करोडो काळ्या रूपयांचा वापर करण्यात आला.

        या निवडणुकीतील काळ्या पैशाचा गैरवापर रोखण्यास भारतीय निवडणूक आयोग कसा अपयशी ठरला,याची चिरफाड करतांना राज्याच्या निवडणुकीत निवडणूक आयोग यंत्रणेतर्फे करोडो रूपये जप्त केले,करोडो रूपयाची दारू,सोने-चांदी जप्त केले.त्याबाबत निवडणूक आयोग व पोलीस यंत्रणेद्वारा राज्यात किती गुन्हे नोंदविले?,कारवाई केली काय? व हा काळा पैस कुणाचा होता?, कुणासाठी वाटला गेला? याचा विस्तृत खुलासा लोकहीतासाठी जाहीर करण्याचे आवाहन डॉ. सुरेश माने यांनी निवडणूक आयुक्तांना केले.

       या बैठकीला बीआरएसपीचे विदर्भातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पक्षाची आवश्यकता लक्षात घेऊन व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूका लक्षात घेऊन पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून पक्षाचे नवीन पदाधिकारी लवकरच घोषित करण्यात येतील,असेही सांगण्यात आले.