ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :-
नवनियुक्त आमदार मसराम यांचा जाहीर सत्कार काल दिनांक 1 डिसेंबर 2024 रोज रविवारला रात्रो आठ वाजता मौजा पाथरगोठा येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात सर्व गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी आमदार यांनी गावातील जनतेचे आभार व्यक्त केले व जनतेने दाखवलेल्या विश्वास सार्थक ठरवणार असा निश्चय केला.
या परिसरातील शेतकऱ्यांचे,बेरोजगारांचे,महिलांचे प्रश्न,अनेक क्षेत्रातील विकास कामे,या क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून करणार असे अभिवचन जनतेला दिले.
तसेच आपल्या राजकीय कारकिर्दित जास्तीत जास्त समाजकारण व कमी राजकारण असणार ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या सत्कार समारंभ प्रसंगी गावातील युवा वर्ग तसेच महिला व ज्येष्ठ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी टिकले यांनी एकीकडे जनशक्ती व दुसरीकडे धनशक्ती असताना यामध्ये जनशक्तीचा या निवडणुकीच्या माध्यमातून विजय झाला असे मत व्यक्त केले.
गोपाल दोनाडकर शिक्षक नाशिक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन कैलास खरकाटे यांनी केले.
गावातील ज्येष्ठ नागरिक नथुजी ढोंगे व डॉक्टर यादव राऊत यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन आमदार यांचा सत्कार केला गेला.गावातील अनेक विकास कामे तसेच समस्या अशा अनेक प्रश्नांवर प्रतिसाद देताना आमदार यांनी सर्व क्षेत्रातील लोकांना आश्वासित केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गावचे सुपुत्र योगेश ढोरे यांनी केले.