नागरिक हक्क संरक्षण समिती नगर परिषद निवडणूक लढविणार…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

           दर्यापूर येथील ख्यातनाम सामाजिक नागरिक संघटन असलेली नागरिक हक्क संरक्षण समिती या संस्थेने लवकरच भविष्यात येणाऱ्या दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक लढविण्याचे ठरविले असून त्या दृष्टीने नुकतीच एक वैचारिक सभा स्थानिक महालक्ष्मी सभागृहात संपन्न झाली.

        त्यात प्रत्येक न.प. प्रभागातून कार्यकारी समिती नियुक्त करण्याचे कामास गती देण्याबाबत ठरविण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि जेष्ठ विधीज्ञ ऍड संतोष कोल्हे यांनी स्थानिक प्रसार माध्यमाला दिली. 

         दर्यापूर शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून नागरिक हक्क संरक्षण समिती करीत असून जन सामान्यांच्या विविध प्रश्नांची उकल शासन दरबारी रेटून समितीने पुर्ण करून घेतली व गरजवंतांना न्याय मिळवून दिला,त्यात प्रामुख्याने दर्यापूर शहरातील पाणीपुरवठा विभाग, विज मंडळ, शहरातील नादुरुस्त वाहतूक व्यवस्था, शासकीय दवाखान्यातील गैरसोयी,ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या, तालुक्यातील महिलांच्या घरकुलांच्या समस्या महिला बचत गटांच्या समस्या एस. टी बाबत तक्रारी, ग्रामिण भागातील गती रोधक टाकणे इत्यादी समस्या समितीने लोक शक्तीच्या माध्यमातून सोडवून घेण्यात यश मिळविले.

           न.प क्षेत्रातील त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये एक विश्वासाचे विशिष्ट स्थान नागरिक हक्क संरक्षण समितीने मिळविले असून दर्यापूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडण्याच्या दृष्टिकोनातून समितीने भविष्यात येणारी नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढविण्याचे ठरविले असल्याचेही माहिती समितीचे सचिव तसा जेष्ठ पत्रकार शरद रोहणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.