मौजा निलजगाव येथे लोकसहभागातून बांधण्यात आला वनराई बंधारा…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील मौजा निलज गाव येथील नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

      आज दिनांक २८ नवंबर २०२४ गुरुवार रोजी निलज गाव येथे नाल्यामधील वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन देणे,जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणे,तसेच गावातील लोकांना दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी मौजा नीलज येथे लोक सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

         यावेळी कृषी सहाय्यक एस.पी.कुबडे,कृषी सहाय्यक श्री.विवेकानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निलज गावाच्या नाल्यात वनराई बंधाऱ्याची आखणी करण्यात आली.

      वनराई बंधारा बांधण्याकरिता विशेष सहकार्य कृषी सहायक शिंदें व एस.पी. कुबड़े यांनी केले व बंधाराचे प्रमुख नियोजन ग्रामपंचायत सदस्य श्री.धनराजजी चकोले यांनी केले.

      यावेळी गावातील शेतकरी श्री.मनोज टोहने,श्री.रोमनजी चकोले,श्री.अजय वाघदरे,श्री.प्रफुल नागपुरे,श्री.राकेशजी पोटभरे,श्री.आकाश चकोले,श्री.रामचंद्र चकोले,श्री.ध्यानसिंग टेकाम,इत्यादी शेतकरी बांधव उपस्थित होते.

      निलज येथील ग्रामपंचायत सचिव श्री.विलास निवारे यांनी उपस्थित गावातील शेतकरी व गावातील लोकांचे आभार व्यक्त केले.