डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनीच जनतेच्या वतीने, सर्वपक्षीय, सर्वसंघटनेच्या वतीने का…..?
कारण…….
आजपर्यंत आपण दरवर्षी या दिवशी शोकाकुल होऊन अंतर्मुख होऊन चिंतन करतो. यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाची आठवण करत संपूर्ण आपण आणि संपूर्ण विश्व् आदरांजली वाहते…..
ही परंपरा आपण गेली 67 वर्षे आपण बाळगत आलोय. परंतू , या वर्षी हे सर्व थोडक्यात आटोपून जर आपण त्याला सार्वजनिक कृतीची संघर्षातून ताबडतोब जोड दिली तर……
ज्या महापुरुषाने एकट्याने आमच्यासाठी जीवनभर व्यवस्थेशी संघर्ष, संघर्ष आणि संघर्षच केला……..
त्या अजरामर संघर्षाला आपण येथील मनुवादी व्यवस्थेला सार्वजनिकरित्या एकजुटीने संघर्षातूनच आदरांजली वाहिली तर……..!
एक ऐतिहासिक क्रांतीचे पाऊल उचलल्याचे समाधान आपल्याला लाभेल…….
म्हणूनच 6 डिसेंबर रोजीच या व्यवस्थेला हादरा देण्याचा संघर्ष आपण या निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि या असंविधानिक सरकारच्या विरोधात हे संघर्षाचे पाऊल उचलूया……
कारण……..
याची दुसरी एक बाजू अशी या मनुवादी ( सर्वोच्च न्यायालय, मुख्य निवडणूक आयोग, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, महानियंत्रक, केंद्रसरकार आणि राज्यसरकारे ) व्यवस्थेचा एक भ्रम झालेला आहे की, आम्ही या जनतेवर इंग्रजांपेक्षा कितीही तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला, किंवा संविधानातील नैतिक कर्तव्याची जास्तीत जास्त मोडतोड करुन यांना हतबल केले की ही भारतीय जनता गुमान आमचा अन्याय सहन करण्याशिवाय यांना पर्याय उरत नाही.
हीच मिजास यांची गेल्या 70 वर्षात यांनी निर्माण केल्यामुळे, आणि आपण सुद्धा तसे अन्याय सहन करत गेल्यामुळे यांची मिजास आज 2024 च्या काळात अती उच्चं टोकावर येऊन बसलेली आहे. म्हणून यांनी आपल्याला गुलामांच्या दर्जापेक्षा जास्त महत्व दिलेले नाही. केवळ आणि केवळ आमच्यातील जाती -धर्माच्या आंतरिक भेदाच्या भिंती उंच उंच उभारून……..!
येथील 100% मनुवादी व्यवस्थेने म्हणजेच RSS/भाजपने नीतिमत्तेला जगाच्या वेशिवर टांगून, संविधानदिनी कुटनीतीने नतमस्तक होऊन, आमच्यातील ( महाराष्ट्रीयन जनतेतील ) विधानसभा निवडणुकीतील EVM मताचा अधिकार हिरावून घेऊन स्वार्थ साधण्यात यशस्वी झाल्यामुळे, जनतेच्या मनातील उद्रेक सॉफ्ट करण्याचा जो प्रयत्न केला, तो म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ रगडण्यासारखा, चीड आणण्याचा प्रकार होय…….!
या प्रकाराला जर मुख्यत्वे खऱ्या अर्थाने संविधानिकरित्या कोण कारणीभूत असेल तर ते म्हणजे केवळ आणि केवळ “मुख्य निवडणूक आयोगच ” 100% कारणीभूत आहे.
कारण…….
या देशाची लोकशाही आचारसंहितेच्या काळात जपण्याचे पूर्ण अधिकार संविधानाने याच मुख्य निवडणूक आयोगाला प्रदान केलेले आहेत. आणि या काळात एक अंश जरी नीतिमत्ता ढासळून कोलमडली तर तीला हें मुख्य निवडणूक आयोगच 100% संविधानिकरित्या जबाबदार असतो………!
आणि आजचे जे मुख्यनिवडणूक आयुक्त राजीवकुमार आहेत. हें मोदी- शहाच्या कुशीतून तिथे बसल्यामुळे त्यांची सदसदविवेक बुद्धी त्यांच्याठायी गहाण पडलेली आहे.
परंतू आदरणीय माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन आणि आदरणीय एस. वाय. कुरेशी साहेबांच्या अनेक वर्षानंतर देशाला 2022 मध्ये होऊन गेले आयुक्त अरुणकुमार गोयल. हे जरी मोदी -शहाच्या शिफारशीने तिथे गेलेले असले तरी त्यांनी मोदी शहा यांना न जुमानता काम करण्याची पद्धतीने असल्याने त्यांची ताबडतोब उचलबांगडी करुन त्यांना एका देशाचे उच्चायुक्त नेमून त्यांचा काटा बाजूला केला.
त्यांच्याही अगोदर 2019 मध्ये देशाला लाभलेले निवडणूक आयुक्त आदरणीय अशोक लवासा साहेब………
ज्यांनी मोठे धाडस करुन मोदी मोदी – शहा यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मला वाटते यांचा आदर्श कदाचित संविधान, टी. एन. शेषण आणि एस. वाय. कुरेशी असू शकतील……..
यामध्ये काही घटना अशा आहेत की जेंव्हा मोदीने 2019 च्या निवडणूक प्रचारात पुलवामा प्रकरणात शहीद झालेल्या एका जवानाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून यांच्या शहीद होण्याच्या बदल्यात भाजपला मतदान करणार नाही का? असा प्रश्न विचारून जनतेकडून जबरदस्तीने होकार वदवून घेतला……..
त्याचप्रमाणे अमित शहाने मुस्लिमांविरुद्ध प्रचारसभेत अपशब्द वापरून हिंदूंची मते मागितली……
त्याचप्रमाणे मोदीने राहुल गांधीने वायनाडमध्ये काँग्रेसच्या प्रचाराला जाऊ नये असे वक्तव्य केले होते…….
8 एप्रिल 2019 रोजी गुजरात भाजपा अध्यक्ष जितू वधवाणी यांनी निवडणूक प्रचारात धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखे शब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर बंदी आणण्याचे आदेश जारी केले……..
ज्या काळात सुप्रीमकोर्टसहित कोणताही अधिकारी मोदी – शहाच्या नजरेत नजर टाकू शकत नसे. अशा काळात या निवडणूक आयुक्त आदरणीय अशोक लवासा साहेबांनी मोदी – शहाच्या विरुद्धच्या तक्रारी नोंदवून त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. त्या आदरणीय अशोक लवासा यांच्या कुटुंबासहीत त्यांना हरासमेंट करण्याचा पाशवी खेळ केला. त्यांच्यावर सी. बी. आय. ची धाड टाकून त्यांचा मुलगा, सून, यांच्यावर धाडी टाकल्या. एवढेच काय घरातील नोकरांची सुद्धा चौकशी केली की तुम्हाला भाजी घेण्यासाठी कोण पॆसे देते? अशी चौकशी सी. बी. आय. मार्फत याच मोदी – शहाने लावली……..!
यांच्यानंतर आलेले जे मुख्यनिवडणूक आयुक्त म्हणजे आजचे राजीवकुमार होत. या दोघांच्या अनुभवातून तावून, सुलाखून निघालेले, निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेतून बाद झालेल्या CJI व्यतिरिक्त मोदी – शहाच्या आशीर्वादाने मुख्य नीवडणूक आयुक्ताच्या खुर्चीत बसलेले राजीव कुमार मोदी -शहाचे गुलाम म्हणूनच काम करणार ना……….?
मग अशा काळात……..
ज्या काळात या राजीवकुमार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या EVM घोटाळ्याचे हजारो पुरावे देऊन सुद्धा सुप्रीमकोर्ट याचिका फेटाळत असेल, आणि जयपूरच्या अजमेर शरीफ दर्ग्याच्या खाली महादेवाची पिंड सापडली म्हणून एका याचिका कर्त्यांची याचिका ताबडतोब दाखल करुन घेते. आणि राजीवकुमार या तक्रारीना केराची टोपली दाखवते……….!
तर मला सांगा संविधानातील मूलभूत अधीकारापैकी सर्वोच्चस्थानी असलेल्या…….
मताच्या अधिकाराचे
EVM द्वारे हणन होत असेल, तरी सुद्धा हा अन्याय या मनूवाद्यांचा आम्ही ( भारतीय जनता ) सहन करायचा का……?
यांची मिजास अशीच वाढू द्यायची का…….?
याचा जाब जर आपण यांना नाही विचारला तर हे आपल्याला असेच संपवून गुलाम बनवतील…….
म्हणून आणि म्हणूनच…….
या व्यवस्थेविरुद्ध , या मुख्यनिवडणूक आयोगाविरुद्ध महामोर्चाचे जनतेतर्फे आयोजन सोबत आलेच तर महाविकास आघाडीचे राजकीय घटकपक्ष आणि इतर जे कोणते संघटना व पक्ष येतील त्या सर्वाना सोबत घेऊन……..
EVM हटवून ताबडतोब बॅलेट पेपरवरच पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका घ्या.
कारण 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे मतदान EVM वर धांदली करुन झालेल्याचे सिद्ध झाल्यामुळेच ही आमची मागणी आहे….
तुमची EVM किती पारदर्शी आहे हे पटवून देण्यात वेळ वाया घालवू नका. आमची भारतीय जनतेची तिच्यावर शंका आहे तर तीला सरळ बाजूला ठेऊन बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्या. या मागणीसाठीच या महामोर्चाचे आयोजन 6 डिसेम्बर या दिवशीच ठेऊया……
जर…….
आदरणीय. डॉ. बाबा आढाव सर
95 व्या वर्षी या व्यवस्थेविरुद्ध लढा उपोषण करुन देऊ शकतात, तर…………