जंगलात अवैध रेतीचे दोन ट्रॅक्टर पकडले…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :-

            मुरपार जंगलातील कक्ष क्रमांक २६ मधील नाल्यात एक ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे वनविभागाच्या एफडीसीएममधील अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असतांना आढळून आले तर दुसरा ट्रॅक्टरचे हुक टूटल्याने जंगलात उभा असल्याचे दिसून आले.

           दोन्ही ट्रॅक्टर चालक मालक यांच्यावर गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर जप्ती करण्यात आले. ही घटना मंगळवार ला रात्री १ वाजता घडली. एक ट्रॅक्टर हे सुभाष राजेराम रणदीवे यांच्या मालकीचे असून चालक अनिकेत विनोद रणदीवे व दुसऱ्या ट्रॅक्टर ज्ञानेश्वर मारोती मेश्राम यांच्या मालकीचे असून चालक रुपेश,यशोक कुमरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला.

            हि कार्यवाही चंद्रपूर वन प्रकल्प विभागचे विभागीय व्यवस्थापक वाय. एस. मरसकोल्हे यांच्या मादर्शनात खडसंगी एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनूरकर, वनरक्षक एस. बी. खोब्रागडे, वनपाल उईके, वनमजूर यादव गोठे, पातूरकर, वाहन चालक संजय साळवे यांनी केली.