नवनिर्वाचित भाजपा आमदार डॉ मिलिंद नरोटे यांची धानोरा येथे भेट… — भाजपा पदाधिकाऱ्यांसी साधला संवाद… — भाजपा कार्यकर्त्यामध्ये संचारला उत्साह…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

          गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदाच आमदार निवडून आलेले डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी धानोरा येथे पहिल्यांदाच भेट दिली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला त्यांची ही भेट अनौपचारिक होती.

         यावेळेस भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये फटाके फटाक फोडून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी धानोरा तालुका अध्यक्ष सौ. लता पुंघाटे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा साईनाथ साळवे भाजपा युवा नेता सारंग साळवे नगरसेवक संजय कुंडू माजी नगरसेवक सुभाष घाईत माजी महामंत्री महादेव गणोरकर साजन गुंडावार गजानन साळवे अनंत साळवे मानवत सचिव कॉपरेटिव बँक प्रकाश कुर्जेकर सौ लीनाताई साळवे माजी नगराध्यक्ष धानोरा सौ भुमाला परचाके राकेश खरवडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

          या भेटी प्रसंगी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांचे औक्षवंत करण्यात आले.  या भेटीमध्ये आमदार डॉक्टर नरोटे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी डॉक्टर मिलिंद नरोटे यांना धानोरा ते चिचोली या नदीवर पूल बांधण्यात यावा तसेच दूधवाला ते मिसगाव या नदीवर सुद्धा पूल बांधून नागरिकांची नागरिकांची जाणे येण्याची सोय करून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावावे यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांना अवगत करून दिले. 

          आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाची व रुग्णालयात असणारे रुग्णांची चौकशी करून विचारपूस विचारपूस केली आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. 

           तसेच पंचायत समिती धानोरा येथे भेट देऊन पंचायत समितीचे बि डी ओ सतीश चिटकुले यांच्याशी संवाद साधून त्यांनी मनरेगा घरकुल व इतर कामाबाबत चौकशी करून प्रत्येक गावातील प्रत्येकांना मजुरांना काम मनरेगा द्वारे काम मिळेल व्हिडिओ यांना देण्यात आल्या तसेच धानोरा पंचायत समितीचे व्हिडिओ सतीश चिटकुले यांनी तसे आश्वासन सुद्धा देण्यात आले याप्रसंगी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.