
भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्या पासून जवळपास बारा किलोमीटर अंतरावर असलेले मोहली हे गाव अनेक समस्यानी ग्रसलेले आहे गावातील मुख्य समस्या म्हणजे गावातील रस्ते पूर्णपणे उखळलेले आहे.
तसेच गावात नालीचा अभाव दिसून येतं आहे. गावातील घरातील सांडपाणी नाली ने जाणे अपेक्षित आहे परंतु नाली पूर्णपणे चोकअप झाल्यामुळे नालीला गटाराच स्वरूप आले आहे.
ही एकाच वार्डातील समस्या नसुन गावातील संपूर्ण वार्डातील समस्या आहे चक्क मोहली ग्रामपंचायतच्या समोरचीच नाली पूर्णपणे चोकअप झाली आहे. ग्रामपंचायत मध्ये प्रवेश करताना नागरिकांना अनुभव येतो तसेच ग्रामपंचायतच्या बाजूला असलेले मातीच घर पावसाळ्यात नालीत साचलेल्या पाण्यामुळे घराचा काही भाग पडले असल्याचे नागरिकांनी सांगितले गावात काही ठिकाणी नालिच नाही काही ठिकाणी आहे तर नालितून सांडपाणी न जाता नालीच पाणी पाटासारखं रस्त्यानी जातानी दिसते.
काही ठिकाणी पाणी साचून राहते यामुळे मच्छर डास पैदास होऊन रोगराई पसरण्याची भीती व्यक्त नागरिकांनी केली आहे. याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झालेले दिसते.
तसेच गावातील रस्ते पूर्णपणे उखालेले आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहे रमेश बारसागडे ते राजीराम मस्के यांच्या घरापर्यंत गरज नसतानाही नालीचे बांधकाम करण्यात आले आहे.
तसेच त्या नालीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे गावाच्या विकासात सरपंच आणि ग्रामसेवक यांची महत्वाची भूमिका असते परंतु गावाच्या विकासात ग्रामसेवक्काची भूमिका उदासीन पणाची दिसुन येते मग ग्रामपंचायत करते तरी काय असा प्रश्न गावातील नागरिक विचारत आहे.