युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
नजिकच्या मिलिंद विद्यालय गौरखेडा (चांदई) येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी.वानखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिक दिपक कावरे, प्रशांत वानखडे ,मनिषा गावंडे, पुरण प्रकाश लव्हाळे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून झाली.
यावेळी विद्यालयातील पाच ते दहाच्या अनेक विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त भाषणे दिली. तसेच विचार मंचावर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अमूल्य अशी माहिती दिली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दिपक कावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुरण प्रकाश लव्हाळे यांनी पार पाडले तर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अमोल बोबडे यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.