रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर –
संविधान सन्मान दिन समारोह वडाळा (पैकू) चिमूर च्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मंगळवार ला संविधान चौक येथील फलकांला माल्यार्पण करून मंगळवारला सायंकाळी पाच वाजता देवराव बोरकर यांनी बाईक रॅलीला तिरंगा झेंडा दाखवून संविधान बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या बाईक रॅलीतून संविधान विषयी जन जागृती करण्यात आली. दरम्यान बाईक रॅली संविधान चौक ते मुख्य मार्गावरील आंबेडकर कॉलनी येथील बाबासाहेब आंबेडकर येथील पुतळ्याला माल्यार्पण अभिवादन करून शहरातील मासळ मार्गाने चावळी चौक, किल्यावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शहीद बालाजी रायपूरकर, महात्मा ज्योतीबा फूले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना माल्यांर्पण अभिवादन करून मार्केट लाईन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीकृती फोटोला माल्यार्पण करून मुख्य मार्गावरील इंदिरा नगर येथील तुकडोजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करत रॅलीची सांगता संविधान चौक वडाळा (पैकू) चिमूर येथे करण्यात आली.
दरम्यान सकाळी वकृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, गित गायन स्पर्धा व सायंकाळी सात वाजता कवी गायक रोशन राजा नागपूर यांचा जागर समतेचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहरातील सर्व जाती धर्म पंथाची नागरीक संविधान बाईक रॅलीत होते.