अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगांव येथे संविधान दिन साजरा…

चिमूर प्रतिनिधी 

         लेखणीतर सर्वांच्या हातात होती पण,राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण उद्देशिकीचे वाचन करण्यात आले.

           कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम पंचायत सरपंच सरीता गुरनुले,यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले की,संविधान ही देशाची ओळख आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून देशाची राज्यघटना साकार झाली आहे संविधानाची जपणूक प्रत्येकानी करायला हवी.

         कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर डॉ.दिलीप चौधरी छातीवार राजे प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूर तथा आदिवासी आश्रम शाळा पळसगांवचे रेवतकर सर,ग्राम पंचायत उपसरपंच तुळसिदास शेरकुरे,पोलीस पाटील पळसगांव रागिना दडमल,उपस्थित होते.

            प्रास्तविक अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखाचे माजी अध्यक्ष प्रदिप गजभिये यांनी केले. संचालन किशोर भिमटे,आभार वैभव रामटेके यांनी मानले. उपासकं उपासिकां व गावातील नागरिक उपस्थित होते.