ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल भारत न्यूज
साकोली :- भारत सरकारने देशातील सर्व महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत “मोदी सरकार” योजनेचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री बिमा योजना सुरू करून पात्र महिलांना प्रतीमाह ७ हजार रुपये मासिक वेतन देण्याची घोषणा केली आहे.
त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ०९ डिसेंबर २०२४ ला पानिपत येथून प्रधानमंत्री बिमा सखी योजनेचा शुभारंभ करीत आहे. या अभिनव योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिला जनतेने घ्यावा असे आवाहन साकोली शाखेतील मुख्य विमा सल्लागार पुजा कुरंजेकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री बिमा सखी योजनेकरिता खासकरून देशातील महिलांमध्ये उत्साह वातावरण निर्माण झालेला आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक फायद्याची असल्यामुळे या योजनेला सफल करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
या योजनेअंतर्गत महिला “बिमा सखी” नियुक्त करून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत महिला विमा अभिकर्त्यांचे कार्य करणार आहेत. पानिपत मध्ये या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य सचिव विवेक जोशी यांनी जिल्हा प्रशासन सोबत व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे मीटिंग घेतली आहे. या मीटिंग मध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. शासनाद्वारे या योजनेत ३५००० पेक्षा जास्त महिला सहभागी होऊ शकतात.
०९ डिसेंबर २०२४ ला प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होणार आहे आणि महीला अभिकर्त्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही योजना महीलांकरिता अतिशय फायदेशीर ठरणार आहे असे मत यावेळी पुजा कुरंजेकर यांनी व्यक्त केले. याअंतर्गत महिलांना आर्थिक व सामाजिक बाबतीत शक्तिशाली बनविणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत महिलांना आपल्या परिवारातील व्यक्तींच्या पालनपोषणासाठी आर्थिक मदत होणार आहे. यासाठी फक्त १० पास महिलाच या योजनेसाठी आवेदन फॉर्म भरू शकतात.
महिलांना या योजनेंतर्गत जितक्या जास्त बिमा करणार तितका जास्त कमीशन त्यांना मिळणार असून सोबतच मासिक वेतनही देण्यात येणार आहे. महिलांना या अंतर्गत तीन वर्ष मासिक वेतन मिळणार आहे.
यामध्ये पहिल्या वर्षी ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी ६०००/- रुपये, तिसऱ्या वर्षी ५०००/- रुपये मासिक वेतन मिळणार. या योजनेत साधारणतः १८ वर्ष ते ५० वर्ष वयोगटातील महिला आवेदन करू शकतात.
योजनेत सहभागी होण्यासाठी खासकरून इच्छुक महिलांनी साकोली शाखेतील महिला अभिकर्ता मुख्य जीवन विमा सल्लागार पुजा नरेश कुरंजेकर यांनी आवाहन केले. तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी वरील फोन ९४०५६७१५०९ संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.