साकोलीत होणार भक्तीमय “श्री शिव महापुराण कथा”… — ०३ डिसेंबर ते ०९ डिसेंबर पर्यंत चालणार हा महोत्सव… –उत्तरप्रदेश वृंदावनहून येणार प.पू. श्री. श्यामसुंदर ठाकूरजी महाराज (बनारस),पवनकुमार अग्रवाल यांचे आयोजन…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- साकोली सेंदूरवाफा शहरात प्रथमच उत्तरप्रदेश येथील बनारस वृंदावनहून कथावाचक श्री श्यामसुंदर ठाकूरजी महाराज यांच्या वाणीतून “श्री शिव महापुराण कथा” महोत्सवाचे आयोजन मॉं टाईल्स मागे सेंदूरवाफा साकोली येथे मंगळवार ३ डिसेंबर ते सोमवार ९ डिसेंबर पर्यंत चालणार. या प्रथमच शहरात होणाऱ्या भव्य दिव्य शिवपुराण महोत्सवात जास्तीत जास्त भक्तभाविकांनी सहपरीवार येत या महोत्सवाचा लाभ घेऊन पुण्य पदरी पाडावे असे आवाहन आयोजक पवनकुमार दूर्गाप्रसाद अग्रवाल यांनी केले आहे. 

          या महोत्सवात कथावाचक परमपूज्य श्री श्यामसुन्दर ठाकुरजी महाराज (बरसानेवाले) वृंदावन यांचे आगमन होत असून कार्यक्रम मंगळवार ०३ डिसेंबर स. १० वा. कलशयात्रा, दुपारी ३ वा. पुराण महिमा, बुधवार ०४ ला दू. ३ वा. विल्वपत्र, भस्म, रुद्राक्ष महिमा, गुरुवार ०५ ला दू. ०३ वा. “सतीजन्म की कथा” शुक्रवार ०६ ला दू. ३ वा. “शिवपार्वती विवाह” व हळदी कुंकु महीलांकरीता. शनिवार ०७ ला दू. ३ वा. “श्री गणेश एवं कार्तिकेय चरित्र” रविवार ०८ ला दू. ०३ वा. “उमा सहिता देवी महिमा” व सोमवार ०९ डिसेंबरला सकाळी ९ वा. “द्वादश ज्योर्तिलींग कथा” दू. ०१ वा, सायं. ०७ वा. पूर्ण आहूती महाप्रसाद” अशी रूपरेषा आखली आहे.

             या सात दिवसीय चालणा-या श्री शिव महापुराण कथा महोत्सवात सहयोग कर्ता गायत्री शक्तीपिठ परिवार साकोली/सेंदुरवाफा, श्री संप्रदाय (श्री गुरुदेव नरेंद्रचार्य महाराज), शिवदुर्गा मंदीर साकोली, श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट सेंदूरवाफा, हनुमान मंदिर आदर्श नगर सेंदुरवाफा, सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ, रामनगर सेंदुरवाफा, विश्वकर्मा राजमिस्त्री अशोसिएशन सेंदुरवाफा / साकोली, शिवशक्ती भागवत मंडळ, बिरसा मुंडा चौक, सेंदुरवाफा, हिंदी भाषिय समिती, श्रीराम हिंदु युवा मंच, फ्रिडम युथ फाऊंडेशन, साकोली, बजरंग दल साकोली, समक्ष फाऊंडेशन साकोली, आत्मा प्रवर्तक मंडळ सेंदूरवाफा आणि समस्त साकोली / सेंदुरवाफा सहयोगी भक्तगण यांनी केले आहे. तर स्थळ नियोजन व व्यवस्थापन मॉं टाईल्स सेंदूरवाफा साकोली हे करीत आहेत.