ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पूजन व द्विपप्रज्जवलन करून करण्यात आली.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करून संविधानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संविधान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाचा इतिहास व संविधानाविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी खोब्रागडे तर आभार प्रतिमा डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.