
त्याचप्रमाणे...
येत्या 26 जानेवारी 2025 रोजी संविधान अंमलबजावणी दिनाला अर्थात प्रजासत्ताक दिनाला सुद्धा 75 वर्षे पूर्ण होतील….
“गेल्या 75 वर्षात आम्ही भारताच्या लोकांनी जागृत संविधान अंमलबजावणीच्या बाबतीत विशेषतः स्वातंत्र्य, समानता,न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांच्या बाबतीत टक्केवारीच्या प्रमाणात किती टक्के जागृत झालो?
हा प्रश्न आपण प्रत्येकानी आपल्याकडे सदसदविवेक बुद्धी असेल तर तीला निश्चित हा प्रश्न विचारा….
आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधून जर वरील प्रश्नाचे उत्तर 0%, 1%, 5%, 10 %, 20%, 25%, 50%,, 75 %, 90 % किंवा 100% होकारार्थी उत्तर मिळत असेल……..
किंवा
याच प्रश्नाचे उत्तर कदाचित….
मायनस म्हणजे -0%, -1%, -5%, -10% , -15%, -20% , -25%, -50%, -75%, – 90% आणि -100%याचे नकारार्थी उत्तर मिळत असेल.
वरील टक्केवारीच्या प्रमाणात आम्ही भारताच्या लोकांनी गेली 75 वर्षे प्रत्येकांनी तपासून पहावी आणि त्या त्या प्रमाणात दुःखी,सुखी,आनंदी, चैनीच्या,विलासाच्या भौतिक गरजा भागविण्यात आपले जीवन जगावे.हे स्वातंत्र्य तर संविधानानेच आपल्या प्रत्येकाला बहाल केलेले आहे.त्यामुळे आपापल्या आकलन क्षमतेप्रमाणे जीवन जगत आलोय……..
जगत राहू……
आणि एक दिवस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन घेऊ!
वरील प्रश्नाचे उत्तर मी ( अनंत भवरे ) माझ्या सदसदविवेक बुद्धीला विचारला आणि त्याचे उत्तर मिळाले.ते असे की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेले भारताचे संविधान ..
हे संपूर्ण सजीव सृष्टीचे कल्याण निर्जीवसृष्टीच्या साहाय्याने कसे साधता येईल आणि निसर्गावादाविरोधी,मानवतावादाविरोधी,संविधानविरोधी अर्थात जागतिक मनुवादी शक्तीला कसे कायमचे मातीत गाडता येईल आणि विज्ञानवादी +विवेकवादी = मानवतावादी विश्व कसे निर्माण करता येईल. यांचा सूत्रबद्ध पद्धतीने विचार करुन, जीवन समर्पित करुन, त्याग आणि संघर्षातून निर्माण केलेले हे भारताचे संविधान आहे…
आणि या संविधानाची अविष्कारीता गेल्या 75 वर्षात म्हणजेच आज या 2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निकालातून हे स्पष्ट झाले की,संविधानविरोधी शक्तीने संविधानवादी शक्तीला 95 % संपविण्यात यशस्वी झालेली आहे….
हे माझ्या आकलनक्षमतेप्रमाणे असलेलं माझं वयक्तिक मत आहे.
म्हणून अशा परिस्थितीत सुद्धा……..
” गुलामांना गुलामीची जाणीव करुन द्या.म्हणजे तो बंड करुन उठल्याशिवाय राहणार नाही.” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशानुसार मी माझे जीवन समर्पित करत आहे.ते केवळ आणि केवळ संविधानाला 5% वरून 100% टक्के नेण्याच्यासाठीच,त्या रस्त्यात शरीर किती साथ देईल?
कारण…
” 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
आता संविधानदिन चार भिंतीत,साजरा करण्याचे दिवस संपले….
आता आम्ही भारताच्या लोकांना रस्त्यावर उतरून, संविधानविरोधी शक्तीची सर्व आव्हाने स्वीकारून या व्यवस्थेविरुद्ध सामूहिकरित्या बंड करण्याची ही शेवटची संधी समजून प्रत्येकाने प्रयत्न करणे. म्हणजेच संविधानदिन साजरा करणे होय….
हा दृढसंकल्प माझ्यासाठी संविधानदिन साजरा करणे होय.
याची सुरुवात आजपासून करत आहे येत्या 26 जानेवारीपर्यंत त्याचे संकेत दिसतील.त्यासाठी तन,मन आणि धनाने समर्पित होण्याचे आपल्या सर्वाना आव्हान माझ्यातर्फे असेल…..
परंतू ,ते NO FORCE , NO REQUEST, ONLY INFORMATION
याच आधारित तत्वावर…..
आपणास या संविधानदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..
आवाहनकर्ता
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…