ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या निवडणुक गडबडी बाबत लोकसभेत जोरदार राडा… — लोकसभेचे अधिवेशन २७ नोव्हेंबर पर्यंत स्थगित..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

        आज लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली.अपेक्षितपणे लोकसभेच्या अधिवेशनाला महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या मार्गदर्शनानंतर सुरुवात होताच ईव्हीएम मशीन द्वारे होणाऱ्या निवडणुकांच्या धांदलीबाबत लोकसभेत जोरदारपणे विरोधी पक्षांकडून मुद्दा रेटून धरण्यात आला.

       यामुळे लोकसभेत प्रचंड प्रमाणात गदारोळ झाला.विरोधिपक्षांच्या खासदारांचे ईव्हीएम मशीन बाबतचे पुराव्यानिशी उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व त्यातंर्गत लोकसभेत जबरदस्त झालेला राडा सत्ता पक्षाला घाम फोडणारा होता.

          यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे अधिवेशन २७ नोव्हेंबर पर्यंत स्थगित केले.

           आज ईव्हीएम मशीन बाबत विरोधी पक्षात दिसलेली एकजूट लोकशाहीचे व देशातील जनतेची रक्षण करण्यासाठी ठरेल अशी देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.